दिल्लीत मराठी मुलांना मारहाण, शिवसेना रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब

रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींना मारहाण करण्यात आल्यानंतर तीव्र चिड व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्हाला स्वेच्छा मरण द्या, अशी मागणी या मुलांनी केली आहे. तशी मागणी मराठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सुरेश प्रभूंकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब, असा इशारा शिवसेनेने दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 12:01 AM IST
दिल्लीत मराठी मुलांना मारहाण, शिवसेना रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब title=

नवी दिल्ली : रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींना मारहाण करण्यात आल्यानंतर तीव्र चिड व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्हाला स्वेच्छा मरण द्या, अशी मागणी या मुलांनी केली आहे. तशी मागणी मराठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सुरेश प्रभूंकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब, असा इशारा शिवसेनेने दिलाय.

दिल्लीत लाठीचार्ज झालेल्या मराठी मुलांची भेट शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली. याबाबत शिवसेना खासदार संतप्त झाले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि राजीवप्रताप रूडी यांना जाब विचारणार आहोत, असे आश्वासन मुलांना सेना खासदारांनी दिले आहे. मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना झी २४ तासने दाखविल्यावर शिवसेनेच्या खासदारांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांनी स्वेच्छा मरण देण्यासंदर्भातचे पत्र चंद्रकांत खैरे यांना दिले. हे पत्र राष्ट्रपती आणि सुरेश प्रभूंना दिले जाणार आहे. शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी संपर्क साधला.  

- खासदार चंद्रकांत खैरे यांचा सवाल

- विद्यार्थ्यांना रोजगार देता येत नसेल तर सरकार कौशल्य विकास कार्यक्रम कशासाठी राबवतंय ?
- राजीव प्रताप रूडी यांना भेटून या विद्यार्थ्यांसाठी काय योजना आणली, असा सवाल विचारणार आहे.
- केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांना लाठीचार्ज केल्याबद्दल तक्रारीचे पत्र पाठविले आहे.

- मराठी मुलामुलींना मारहाण झाल्याचे पुरावेसमोर आहेत.
- रोजगार देण्याच्या वयात युवकांना काठ्यांनी झोडपलं जातंय
- शिवसेना या मुलांच्या पाठीशी आहे.
- लाठीचार्ज करणा-यांवर *कारवाई* करावी
- या मुलांना न्याय मिळवून देणार 
- सुरेश प्रभूंना जाब विचारणार 

मुंबईतील विद्यार्थीनींची कैफियत 

- शांततेत निदर्शन करत असताना केस ओढत फरफटत नेले
- काठ्यांनी मारहाण केली
- आम्ही कोणत्या परिस्थितीत प्रशिक्षण घेतले हे सरकारने पाहावं
- *हालाखीत* काम करताना रेल्वे अॅप्रेंटेसचे प्रशिक्षण घेतले
- कुटुंबात कोणीच कमवतं नाही 
- रेल्वेने आम्हाला प्रशिक्षण तरी का दिलं ?
- विद्यार्थीनीनी मांडली कैफीयत
- मध्य रेल्वेच्या विद्यार्थ्यांना भरती करून घेतलं, पश्चिम रेल्वेच्या मुलांनी काय पाप केलंय ?
- विद्यार्थिनींचा संतप्त सवाल