पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी मिशेल ओबामाचं क्विक लंच!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अनेक विदेश दौरे ठरले आहेत. त्यामधलाच एक महत्वाचा दौरा म्हणजे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा. या आधीच्या पंतप्रधानांसाठी अमेरिका दौर्‍यात राजकीय भोजनाचं आयोजन असायचं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनी राजकीय भोजनाऐवजी 'क्विक लंच'चं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Jul 21, 2014, 09:38 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी मिशेल ओबामाचं क्विक लंच! title=

न्‍युयार्क : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अनेक विदेश दौरे ठरले आहेत. त्यामधलाच एक महत्वाचा दौरा म्हणजे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा. या आधीच्या पंतप्रधानांसाठी अमेरिका दौर्‍यात राजकीय भोजनाचं आयोजन असायचं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनी राजकीय भोजनाऐवजी 'क्विक लंच'चं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कोणत्याही प्रकारचं थाटामाटातलं भोजन ठेवण्यापेक्षा 'क्विक लंच'चं आयोजन करण्यात यावं, असं राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांना वाटतं अशी माहिती 'इंडियन अॅब्रॉड' या वृत्तपत्रानं दिली आहे. ही माहिती पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्यावर सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. विदेश दौर्‍यासंदर्भात मागील आठवड्यात काही संदेशांची देवाण घेवाण झाल्याचीही बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौर्‍यात न्यूयॉर्कच्या 'युनायटेड नेशन जनरल असेंब्ली'च्या सत्रात भाषणही करणार आहेत आणि त्यानंतर ते वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत.
 
फेब्रूवारीमध्ये आयोजित माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी सर्वात महागडे राजकीय भोजन होतं. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आतापर्यंत 5 राजकीय भोजनांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये एकूण 1.55 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 10 कोटी रुपये एवढा खर्च केला गेला होता. यामध्ये सर्वात जास्त खर्च माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी म्हणजेच 572,187.36 डॉलर अंदाजे साडे तीन कोटी एवढा होता. त्यामुळं मोदींसाठी ठेवण्यात आलेला हा 'क्विक लंच' राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
 
काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणारी अमेरिका आता मात्र लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.