तीन तासात करोडपती

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, May 7, 2013 - 14:20

तीन तासात करोडपती
www.24taas.com, झी मीडिया, कोटा
कोटामधील खेडली फाटक परिसरातील सुभाष कॉलनीतील युको बॅंक शाखेचे खातेधारक कुलदीप कौर करोडपती झालेत. तीन तासात कुलदीप कौर हे करोडपती झालेत. कौर यांनी आपल्या बॅंक खात्यामध्ये दोन हजार रूपये भरले होते.
कुलदीप कौर यांनी सोमवारी दुपारी आपल्या खात्यात दोन हजार रूपये जमा केले. त्यांनी पैसे भरलेली पावती घेतली. त्यानंतर ते घरी गेले. मात्र, चुकीमुळे दोन हजार रूपयांच्या ऐवजी दोन कोटी रूपये त्यांच्या खात्यात जमा झालेत.
आपली चूक काहीवेळाने लक्षात आल्यानंतर जमा केलेली रक्कम पुन्हा बॅंकेने काढून घेतली. रक्कम डेबिट झाल्यानंतर बॅंकेचे प्रबंधक यांनी मोकळा श्वास सोडला.

First Published: Tuesday, May 7, 2013 - 14:20
comments powered by Disqus