दाम्पत्याने काढला मोलकरणीचा नग्न MMS

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, November 18, 2013 - 19:37

www.24taas.com, संबलपूर
घरकाम करायला माणसं मिळत नाही, ही बाब जरी खरी असली तरी आपल्या घरातील मोलकरणीने काम सोडू नये म्हणून ओदिशातील एका दाम्पत्त्याने एक शरमेने मान खाली घालणारे कृत्य केलं आहे. या दाम्पत्याने मोलकरणीचे कपडे काढून तिला नग्न केले आणि तिचा एमएमएस काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नोकरी सोडल्यास हा एमएमएस इंटरनेटवर अपलोड करु अशी धमकी या दाम्पत्त्याने त्या अल्पवयीन मोलकरणीला दिली होती. मूळचे बिहारमधील असलेल्या मुकुल सिंह आणि त्याची पत्नी अर्चना हे दाम्पत्त्य संबलपुर जिल्ह्यातील बेलपहाड येथे राहत आहेत.
मुकुलसिंह हे ओदिशातील एका कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. या दाम्पत्त्याने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरकामासाठी ठेवले होते. गेल्या दोन वर्षांपासून ही मुलगी दाम्पत्त्याच्या घरी कामाला होती. कामात चूक झाल्यास सिंह दाम्पत्त्य तिला बेदम मारहाण करायचे.
धक्कादायक म्हणजे या मुलीने काम सोडून जाऊ नये म्हणून दाम्पत्त्याने तिला नग्न करुन मोबाईलवर एमएमएस तयार केला होता. नोकरी सोडल्यास हा एमएमएस सार्वजनिक करू अशी धमकी तिला देण्यात आली. शनिवारी पिडीत मुलीने कशीबशी घरातून स्वतःची सुटका करुन घेत आईवडिलांच्या घरी धाव घेतली.
आईवडिलांना सर्व प्रकार सांगितल्यावर त्यांनी मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठले. याघटनेने स्थानिकांमध्य असंतोष निर्माण झाला होता. आरोपी दाम्पत्त्याला अटक करावी यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी या दाम्पत्त्याच्या घरी धडक दिली असता दाम्पत्त्य घरातून पसार झाले होते. सध्या पोलिस या दाम्पत्त्याचा शोध घेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Monday, November 18, 2013 - 19:37


comments powered by Disqus