मिस यूनिवर्स २०१२चं ‘ताज महल’वर चुकीचं पाऊल!

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, October 8, 2013 - 16:12

www.24taas.com,वृत्तसंस्था, आग्रा
मिस यूनिवर्स २०१२ ओलिविया कल्पो हिनं भारताची शान असलेल्या ताज ‘महल’वर चुकीचं पाऊल ठेवलंय. काल भारताच्या पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण टीमनं मिस यूनिवर्स २०१२ विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.
भारताच्या १० दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या ओलिविया आणि तिच्या टीमनं सुरुवातीला ताज महलचा फेरफटका मारला. मात्र जेव्हा ते ताज महलच्या सेंट्रल टॅकसमोर असलेल्या मार्बल प्लॅटफॉर्म ज्याला डायना सिट म्हणूनही ओळखल्या जातं तिथं आले. तेव्हा त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या पिशवीमधून वेगवेगळ्या प्रकारचे जोडे-चपला काढल्या आणि त्यासोबतचं फोटोशूट सुरू केलं.
सुप्रिम कोर्टाच्या निर्देशांनुसार ताज महलच्या परिसरात कोणत्याही प्रकारचं ब्रँण्डींग किंवा पब्लिसिटी करण्यावर बंदी आहे. मात्र असं असतांनाही ओलिविया आणि तिच्या टीमनं तिथं फोटोशूट केलं. पुरातत्त्व विभाग यासंबंधीचे पुरावे गोळा करत असून या टीमविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
दरम्यान, ओलिविया आणि तिच्यासोबत असलेल्या जाहीरात कंपनीच्या लोकांनी चपला, बुटांनी भरलेली पिशवी ताज महल परिसरात नेलीच कशी, असा सवाल उपस्थित होतोय. कारण तिथं सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व तपासण्या होत असतात, मग असं झालंच कसं? शिवाय ते फोटोशूट सुरू असतांना तिथं ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारीही दिसतायेत. त्यामुळं आता या पोलिसांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेल्या पर्यटन पोलीस आणि सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांकडूनही याबाबतचं उत्तर मागवण्यात आल्याचं पुरातत्त्व विभाग आग्राचे अधिक्षक एन. के. पाठक यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013 - 16:12
comments powered by Disqus