रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट

रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाठविणे आजपासून स्वस्त झालंय. देशभरातील 'रोमिंग‘चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे.

PTI | Updated: May 1, 2015, 10:21 AM IST
रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट title=

नवी दिल्ली : रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाठविणे आजपासून स्वस्त झालंय. देशभरातील 'रोमिंग‘चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे.

रोमिंगमध्ये मोबाईल कॉलचे दर २३ टक्के, तर एसएमएसचे दर ७५ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत.  ट्रायने दूरध्वनी ऑपरेटर्सना नवा रोमिंग प्लॅन लागू करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय रोमिंग सर्व्हिससाठी कमाल शुल्कही कमी केले आहे. 

यापूर्वी राष्ट्रीय रोमिंगचे दर २०१३ मध्ये बदलले होते. तर बीएसएनएलने ग्राहकांना फ्री गिफ्ट दिलंय. लॅण्डलाईन फोनवरुन रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बोलणं मोफत केलं आहे.  तर आजपासून राज्यातील सुमारे २७ हजार ९२० ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभेत जलयुक्त शिवारचा जागर होणार आहे. 

स्वच्छ भारत अभियान, सर्वांसाठी शिक्षण, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण समृद्धी यासाठी गावकरी शपथ घेतील. प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावक-यांना दिली जाईल. याचबरोबर गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न घेऊन पंचायत राज सप्ताहाची सांगता होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.