मोदींचा हिंदुत्वाचा मुद्दा मागे?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गेल्यावेळ प्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 6, 2012, 10:22 AM IST

www.24taas.com, गांधीनगर
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गेल्यावेळ प्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पदाधिकार्यां चे म्हणणे आहे की, 2002 आणि 2007 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी गोध्रा हत्याकांडाच्य़ा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी निवडणूक जिंकले होते. जातीय दंगलींमुळे लोकभावना आपल्या बाजून वळवण्यात यावेळी त्यांना यश आलं होतं. मात्र आता ते गुजरातमधील पाणी टंचाई, महागाई या मुद्दयांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसून आलंय. काँग्रेसने निवडून आल्यास स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्याचं अश्वासन दिलं आहे, याच धर्तीवर मोदी यांनीही विकासाचं राजकारण करण्यास सुरूवात केली आहे.
गुजरातमधील जातीय दंगलींनंतर मोदींची मुस्लिमद्वेष्टी प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. ‘सद्भावना मिशन’मुळे त्यांचा मुस्लिमांबद्दल दृष्टिकोन मवाळ झाल्याचे दिसत आहे. केशुभाई पटेल यांनी स्थापन केलेल्या ‘गुजरात परिवर्तन पार्टी’मुळे गुजरातमधील समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. अशावेळी केवळ हिंदुत्वाचा मुद्दा पुरेसा नाही. त्यामुळे या वेळी निवडणुकीत हिंदुत्व हा मुख्य मुद्दा असणार नाही.