मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी : लालू यादव

 शपथविधीसोहळ्यादरम्यान तेजप्रताप यादवने चुकीची शपथ घेतल्यावरुन सवाल उपस्थित केले जात असताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Updated: Nov 23, 2015, 11:00 AM IST
मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी : लालू यादव title=

पाटणा : शपथविधीसोहळ्यादरम्यान तेजप्रताप यादवने चुकीची शपथ घेतल्यावरुन सवाल उपस्थित केले जात असताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

नरेंद्र मोदींनीही पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान चुकीची शपथ घेतली  होती. त्यामुळे मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी असे लालूंनी सांगितले. ट्विटरवरुन त्यांनी मोदींना हा सल्ला दिलाय. तसेच त्यांच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतानाचा व्हिडीओही शेअर केलाय. 'शपथविधीदरम्यान ‘अक्षुण्ण’ या शब्दाचा उच्चार त्यांनी केला नव्हता. त्यामुऴे त्यांनी पुन्हा शपथ घेतली पाहिजे. ‘अक्षण्ण’चा हिंदीमध्ये कोणताही शाब्दिक अर्थ नाही,' असे लालू ट्विटरवर म्हणालेत.

 

दोन दिवसांपूर्वींच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान लालू यांचे पुत्र तेजप्रताप यादवे शपथ घेताना चुकीचा शब्द उच्चारला होता. त्यामुळे चहूबाजूंनी त्याच्यावर टीका केली जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.