मोदी समर्थकांचा अडवाणींवर हल्लाबोल!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, June 8, 2013 - 21:39

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लालकृष्ण अडवाणींच्या घराबाहेर मोदिंच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली. नरेंद्र मोदी आर्मी आणि हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली. परंतू, याच्याशी भाजपचा संबंध नसल्याचं स्पष्टिकरण प्रवक्ता शहरानवाज हुसेन यांनी दिलंय.
`जन जन की यही पुकार नरेंद्र मोदी अगली बार`... `नरेंद्र मोदी को कमान, अडवाणीजी का सम्मान`... अशी जोरदार घोषणाबाजी करत मोदी समर्थकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. मोदींना विरोध करण्यासाठी गोव्यात सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीला अडवाणींनी आजारपणाचे कारण पुढे करत दांडी मारल्याने मोदी समर्थक भडकले आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पणजीमध्ये सुरुवात झालीय. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीनंतर भाजपामध्ये नव्या युगाची नांदी होणार असल्याचं मानलं जातंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे आगामी लोकसभा निवडणुकीची धुरा सोपवण्यात येईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय. मोदींप्रमाणेच भाजपामधील अनेक युवा चेहऱ्यांना आगामी काळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्रकृती बरी नसल्यामुळे अनुपस्थित आहेत. त्यांच्या गैरहजरेची कोणताही गैरअर्थ काढू नये, असं आवाहन भाजापा प्रवक्ते शहनावझ हुसेन यांनी केलंय. अडवाणी यांच्या घरासमोर जमलेले मंडळी हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, असा दावाही हुसेन यांनी यावेळी केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 8, 2013 - 21:39
comments powered by Disqus