काश्मीर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी असल्याचा खुलासा

लष्कराच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, घाटीमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये अधिक स्थानिक दहशतवादी आहेत.

Updated: May 14, 2017, 11:19 AM IST
काश्मीर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी असल्याचा खुलासा title=

श्रीनगर : लष्कराच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, घाटीमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये अधिक स्थानिक दहशतवादी आहेत.

विक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग जीओसी मेजर जनरल बी. एस. राजू यांनी घाटीमध्ये १०० दहशतवादी लपून बसले असल्याचा दावा केला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सध्या सर्वात जास्त दहशतवादी सक्रीय आहेत. ज्यांना स्थानिकांचा देखील पाठिंबा आहे.