'बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे'

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील लेखात म्हटलं आहे,  "बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत".

Updated: May 20, 2015, 01:24 PM IST
 'बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे' title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील लेखात म्हटलं आहे,  "बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत".

मंगळवारीही त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलेल्या "डू वुई हेट टू बी बोर्न इन इंडिया? 'या लेखात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरियामधील भाषणावर टीका करताना मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. 

"ज्याप्रमाणे एका महान व्यक्तीने कोरियामध्ये म्हटले, तसे मला कधीही भारतामध्ये जन्म घेतल्याचा गुन्हा वाटला नाही.' असे म्हणत बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"मला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली गरीबी, बेरोजगारी, महागाई, सामान्य जनतेसाठी आरोग्य तसेच शिक्षणाची कमतरता, ५० टक्के बालकांचा कुपोषणामुळे गेलेला बळी, शेतकऱ्यांची आत्महत्या, महिला, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अंधश्रद्धा या गोष्टींचा मला तिरस्कार वाटतो, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

एवढी सगळी वाईट अवस्था असूनही भारतात जन्मल्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. भारतात जन्मल्याचा अभिमान वाटावा अशा काही गोष्टींची उदाहरणेही त्यांनी लेखात दिली आहेत. अलिकडे काटजू सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत चर्चेत राहिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.