६० वर्षांची आज्जी... १० महिन्यात पाचव्यांदा गर्भवती!

६० वर्षांची एक बाई १० महिन्यात तब्बल पाच वेळा गर्भवती राहते... दुसरी चार महिन्यांत तीसऱ्यांदा... हा प्रकार सध्या घडताना दिसतोय तो उत्तरप्रदेशात... 'जननी सुरक्षा योजने'तून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. 

Updated: Jul 3, 2015, 08:59 PM IST
६० वर्षांची आज्जी... १० महिन्यात पाचव्यांदा गर्भवती! title=

बरेली : ६० वर्षांची एक बाई १० महिन्यात तब्बल पाच वेळा गर्भवती राहते... दुसरी चार महिन्यांत तीसऱ्यांदा... हा प्रकार सध्या घडताना दिसतोय तो उत्तरप्रदेशात... 'जननी सुरक्षा योजने'तून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. 

चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रायमरी हेल्थ सेंटर्सच्या कर्मचाऱ्यांनी या गंगेत चांगलाच हात धुवून घेतलाय. भागातील महिलांना काही-बाही लालूच देऊन या कारनाम्यासाठी हे कर्मचारी त्यांना तयार करतात. योजनेद्वारे कागदांवर 'त्या' प्रत्येक महिलेच्या नावावर १४०० रुपये दिले जातात. त्यातील बहुतांश भाग हा कर्मचाऱ्यांच्याच खिशात जातो... आणि या सर्व प्रकारामुळे खरे लाभार्थी मात्र या लाभापासून वंचित राहतात.  

या सर्व प्रकाराचा सुगावा लागला तो बदायू इथल्या आशा देवी नावाची एक महिला आपल्या नावावर योजनेद्वारे चार महिन्यात तीन वेळा मिळालेला चेक घेऊन बँकेत दाखल झाली तेव्हा... या महिलेनं २८ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिल्याचं सांगत १४०० रुपये घेतले पुन्हा मार्चमध्येही तिनं हाच दावा केला... त्यानंतर पुन्हा २० मे रोजीही तिला मुल झाल्याचं तिनं सांगितलं. 

बँक अधिकाऱ्यांना या बाईचा संशय आला आणि त्यांनी आरोग्य विभागाला याची सूचना दिली. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. 

२००५ साली केंद्र सरकारनं गरीब महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी 'जननी सुरक्षा योजना' सुरू केली होती. प्रसुतीनंतर महिलेला पौष्टीक भोजन मिळावं आणि आई-बाळ यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी तिला १४०० रुपये दिले जातात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.