कट्टर वैरी मुलायम सिंह - लालूप्रसाद यादव होणार व्याही

राजकारणातील कट्टर वैरी मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव लवकरच व्याही बनणार आहेत. लालूंची कन्या मुलायम सिंह यादवांच्या घरची सून बनणार आहे.

Updated: Nov 28, 2014, 07:13 PM IST
कट्टर वैरी मुलायम सिंह - लालूप्रसाद यादव  होणार व्याही title=

लखनऊ : राजकारणातील कट्टर वैरी मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव लवकरच व्याही बनणार आहेत. लालूंची कन्या मुलायम सिंह यादवांच्या घरची सून बनणार आहे.

लालू यादव यांची कन्या राजलक्ष्मी आणि मुलायम सिंह यादव यांचे नातू तेजप्रताप या दोघांचं लग्न ठरलंय. डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार असून फेब्रुवारीत लग्नाचा बार उडणार आहे. तेजप्रताप हे लोकसभा निवडणुकीत मैनपुरी मतदारसंघातून निवडून आलेत.

राम मनोहर लोहिया यांचे शिष्य असलेले लालू आणि मुलायम एकेकाळी खांद्याला खांदा लावून समाजवादी चळवळीत कार्यरत होते. राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. 

देवेगौडा यांच्यानंतर मुलायम सिंह यादव यांना देशाचे पंतप्रधानपद भूषवण्याची संधी आली होती. मात्र लालूंमुळेच ती हुकल्याचा मुलायम यांचा आरोप होता. त्यामुळं तेव्हापासून त्यांच्यात कटुता राहिलीय. ही कटुता आता मित्रत्वातच नाही तर नात्यामध्ये बदलणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.