‘लोकल रेट’वर देशभरात करा कॉल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी आपल्या टीमला नव्या योजनांची एक लिस्ट सुपूर्द केलीय. यामध्ये, मोदींनी आपल्या 17 इच्छा आपल्या मंत्र्यांपर्यंत पोहचवल्यात.

Updated: Jul 24, 2014, 04:40 PM IST
‘लोकल रेट’वर देशभरात करा कॉल!   title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी आपल्या टीमला नव्या योजनांची एक लिस्ट सुपूर्द केलीय. यामध्ये, मोदींनी आपल्या 17 इच्छा आपल्या मंत्र्यांपर्यंत पोहचवल्यात.

10 जुलै रोजी मोदींनी आपली ही विशलिस्ट आपल्या मंत्र्यांपर्यंत पोहचवलीय. या सगळ्या अशा ‘विश’ आहेत ज्या मोठ्या प्रमाणात जनतेला खूश करणार आहेत. सरकारही आपल्या 100 दिवस पूर्ण करण्याच्या निमित्तानं लोकांना खुशखबर देण्याच्या प्रयत्नात आहे. 

एसटीडी कॉलचा रेट लोकल कॉलच्या दरांइतकाच असावा, अशीही या विशलिस्टमध्ये मोदींची एक विश आहे. पंतप्रधान मोदींनी कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जेवर जास्त भर दिलाय. यामुळे, देशातील दळण-वळणालाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर नेटवर्कचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. 

याशिवाय, मध्यप्रदेशपासून आंध्रप्रदेशपर्यंत कान्हा-कृष्णा कॉरिडोर बनविण्याचाही प्रस्ताव यात मांडला गेलाय. यामध्ये हायवे, रेल्वे नेटवर्कसहीत गेल अँन्ड ऑईल पाईपलाईनचाही समावेश आहे. सोबतच, शहरांमध्ये मेट्रो ट्रेन आणि बीआरटी सिस्टम विकसीत करण्यावरही मोदींनी जोर दिलाय. लोकांना कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत प्रवास करता यावा, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. 

लोकांच्या घराघरांपर्यंत वीज पोहचवणं, शहरांत मिनी ग्रीड लावणं, गावांत ग्रीड उपलब्ध करून देणं अशाही मुद्द्यांचा पंतप्रधानांच्या 17 सूत्री लिस्टमध्ये समावेश आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.