मोदींनी ‘सचिन’ आणि ‘मंगळयाना’लाही सोडलं मागे!

गुजराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भारतात फेसबुकमध्ये सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती बनले आहेत. त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अॅपलच्या आयफोन ५लाही मागे सोडलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 10, 2013, 09:18 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भारतात फेसबुकमध्ये सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती बनले आहेत. त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अॅपलच्या आयफोन ५लाही मागे सोडलंय.
या सोशल नेटवर्किंग साईटनुसार आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन आणि भारताचं ‘मंगळयान मिशन’ यांची सुद्धा मोदींपुढं पिछेहाट झालीय.
३१ जून २०१३ला संपलेल्या फेसबुकच्या तीन महिन्याच्या सर्वेक्षणानुसार फेसबुकवर एकूण १.१९ अब्ज मासिक वापरकर्ते आहेत. त्यातले ८.२ कोटी भारतीय आहेत. फेसबुककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर सर्वाधिक चर्चेत असलेले व्यक्ती आणि घटनांचा यात अभ्यास करण्यात आलाय. त्यानुसार पहिला नंबर नरेंद्र मोदींचा लागतो, दुसरा सचिन तेंडुलकर, तिसरा आयफोन ५, रघुराम राजन आणि मंगळयानाचा...
गेल्या महिन्यात भारतानं मंगळयान पाठवलं, त्यासोबतच भारत, अमेरिका आणि युरोपच्या काही देशांच्या गटात सहभागी झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.