अखेर काँग्रेसनं केलं कबुल, काँग्रेससाठी मोदी मोठं आव्हान!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज कबुल केलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 10, 2013, 05:03 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पणजी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज कबुल केलं.
चिदंबरम पणजी इथं आयोजित ‘थिंकफेस्ट’ या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चर्चेत म्हणाले, “राजकीय पक्ष म्हणून ते (मोदी) आव्हान देणारे व्यक्ती आहेत. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ते मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. आमचं त्यांच्यावर लक्ष आहे.” मात्र नरेंद्र मोदी आपल्या भाषणात वापरत असलेली भाषा, मोदींची विचारधारा हे आपल्याला मान्य नसल्याचंही चिदंबरम म्हणाले.
आतापर्यंत मोदींनी फक्त निवडणुकांदरम्याची आश्वासनं दिली आहे, कोणता मोठा मुद्दा त्यांनी उचलला नाही, असंही अर्थमंत्री म्हणाले. शिवाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी भावी पंतप्रधान व्हावे, असं वाटत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशाची सत्ता आता युवापिढीच्या हाती जावी, असं मला वाटत असल्याचं चिदंबरम म्हणाले. सध्या देशात अनेक तरुण-तरुणी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. तसंच राहुल गांधींनी सभेपेक्षा रॅलीकडे लक्ष द्यावं, असा मोलाचा सल्लाही चिदंबरम यांनी राहुल गांधींना दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.