नरेंद्र मोदींची घणाघाती टीका, काय म्हणालेत मोदी?

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, September 25, 2013 - 17:09

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
२०१४ मध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या हितासाठी काँग्रेसने सीबीआयचा वापर केला आहे. देशाची वाट काँग्रेस सरकारमुळे झाली आहे, असे मोदी म्हणालेत.
तीव्र नाराजीनंतर नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी प्रथम एकाच व्यासपीठावर आलेत. यावेळी मोदींनी अडवाणी यांनी पुष्पगुच्छ दिला. त्यावेळी त्यांनी मोदींकडे पाहिले नाही. तर मोदींनी अडवाणींचे आर्शीवाद घेतले त्यावेळी अडवाणी यांनी शिवराज चौहाण यांच्याकडे पाहणे पसंत केले. त्यामुळे अडवाणींची नाराजी जाहीररित्या व्यासपिठावर दिसून आली.
भाषणातील ठळक मुद्दे
- अडवाणी आमचे मार्गदर्शक- मोदी
- मोदींची UPA सरकारवर टीका
- काँग्रेसने आम आदमीचे काय भले केले?
- शिवराजसिंग चौहान यांचं केलं कौतुक
- मध्य प्रदेशात पुन्हा भाजप सरकार येईल
- भाजपशासित राज्यांत प्रत्येक राज्याचा विकास
- काँग्रेसने सामान्य मामसाला वेठीस धरू नये
- राजकारणाशिवाय काँग्रेस काहीही करत नाही
- म. गांधींचं स्वप्न पूर्ण करण्याचं मोदींनी केलं आवाहन
- काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न होतं
- मला देशाच्या जनतेवर पू्र्ण विश्वास आहे
- मध्य प्रदेशाला काँग्रेसची सापत्न वागणूक
- काँग्रेस सत्तेत आल्यास मध्य प्रदेशचं शोषण करेल
- काँग्रेसने CBI चा गैरवापर केला- मोदी
- प्रत्येक सर्वेक्षणामध्ये भाजपशासित राज्यांच्या विकासाचं कौतुक आहे.
- काश्मीर ते कन्याकुमारी भाजपचं वादळ उठलं आहे.
-राजकारणाशिवाय काँग्रेस काहीही करत नाही

पाहा व्हिडिओ

मोदींचे भाषण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013 - 16:03
comments powered by Disqus