मिशन २०१४ - पंजाबमध्ये नरेंद्र मोदी करणार शंखनाद

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, June 23, 2013 - 12:33

www.24taas.com, झी मीडिया, पठानकोट
भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधल्या माधोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. निवडणूक प्रचाराची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा आहे. याच सभेत नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुक २०१४चा शंखनाद करणार आहेत.
मोदींना नेतृत्व सोपवल्यानंतर नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडनं एनडीएला रामराम ठोकलाय. त्यामुळे मोदी या सभेत नितीशकुमारांचा कसा समाचार घेतात? याकडं सगळ्याचं लक्ष असेल. पंजाबात होणाऱ्या या सभेत मोदी पाकिस्तानविषयकही आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसाच्या निमित्तानं आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात मोदींची उपस्थित सगळ्यांचं लक्ष खेचून घेतेय. रविवारी जवळपास सहा तास मोदी पठानकोठमध्ये असतील.

आजची सभा यशस्वी होण्यासाठी भाजपानं जय्यत तयारी केलीय. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादलही आजच्या सभेत सहभागी होणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 23, 2013 - 12:33
comments powered by Disqus