`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, October 21, 2013 - 08:34

www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
नवाज शरीफ तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेउन हा प्रश्न मांडणार असल्याचं नवाज शरीफ यांनी सांगितलं. भारत-पाकिस्तान यांच्यात गेली साठ वर्षे तणावाच्या बनलेल्या काश्मीर प्रश्नावर आता परकीय हस्तक्षेपाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.
पाकिस्तानने अमेरिकेकडं सातत्यानं मध्यस्थीसाठी आग्रह धरला असला तरी काश्मीर प्रश्नय भारत आणि पाकिस्ताननंच चर्चेनं सोडविला पाहिजे, अशी ठाम भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. शरीफ बुधवारी वॉशिंग्टन इथं ओबामांची भेट घेणार आहेत. या भेटीत भारत-पाकिस्तान संबंधांबरोबर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांवरही चर्चा होण्याची शक्य्ता आहे. पंतप्रधानपदाच्या सध्याच्या कार्यकाळातील शरीफ यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे.

मात्र शरीफ यांच्या या मतावर भारतातल्या सर्वच पक्षांनी कडाडून टीका केलीय. काश्मीनर प्रश्नारवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, असं भारताचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले, "सीमेवर होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांवर मी यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र दोन देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. अमेरिकेचे पाकिस्तानशी आर्थिक हितसंबंध आहेत. मात्र हे हितसंबंध भारताच्या सुरक्षेच्या मुद्यांशी जोडले जाऊ नयेत. अमेरिकादेखील हा मुद्दा लक्षात ठेवेल अशी अपेक्षा आहे.`` एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुर्शिद यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 21, 2013 - 08:26
comments powered by Disqus