रेल्वे भाडेवाढीचे नव्या मंत्र्यांचे संकेत

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे भाडेवाढीला विरोध केला असताना आता पुन्हा काँग्रेसने रेल्वेची भाडेवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नव्याने रेल्वेमंत्री झालेले पवनकुमार बन्सल यांनी सुधारणा करण्याच्या नावाखाली भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 29, 2012, 10:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे भाडेवाढीला विरोध केला असताना आता पुन्हा काँग्रेसने रेल्वेची भाडेवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नव्याने रेल्वेमंत्री झालेले पवनकुमार बन्सल यांनी सुधारणा करण्याच्या नावाखाली भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
सेवेत सुधारणा करण्यासाठी रेल्वेचे तिकीट दर वाढविण्यात येऊ शकतात. सेवेत सुधारणा करण्यासाठी रेल्वेचे तिकीट दर वाढविण्याची गरज असेल तर ते वाढविले जातील. नफा कमाविण्याचा उद्देश तिकीट दर वाढीमागे नसेल, असे जरी बन्सल यांनी स्पष्ट केले तरी काँग्रेसकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय शक्य नसल्याचे बोलले जात आहे. रेल्वेभाढीसंदर्भात मंगळवारी रेल्वे मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे.
युपीए सरकरामधून रेल्वे भाडेवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याआधी ममता यांनी आपल्याच पक्षाचे मंत्र्यांना भाडेवाढ केल्याप्रकरणी त्यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे भाडेवाढ झाली नाही. त्यामुळे ममता यांना शह देण्यासाठी पुन्हा भाडेभाढीचे संकेत देण्यात आले आहेत.
बन्सल यांच्या संकेत म्हणजे महागाईत अधिक भर असल्याचे म्हटले जात आह. रेल्वभाडेवाढीबाबत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. सशक्त आर्थिक तत्त्वांवर आम्हाला रेल्वेचा कार्यभार चालवायचा आहे. रेल्वेच्या सेवेत सुधारणा झाली तर सरकारने तिकीट दर वाढविले तरी चालतील असे मला अनेकांनी सुचविले आहे, असे पवन बन्सल यांनी म्हटले आहे.

सुरक्षा आणि रेल्वेचे आधुनिकीकरण ही माझी प्राथमिकता राहील. गेल्या तीन वर्षांत सुरक्षा आणि आधुनिकीकरणावर काहीही काम झालेले नाही. पंतप्रधानांनी माझ्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या अपेक्षांवर उतरण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
महागाईच्या वणव्यात होरपळणा-या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही असं दिसतयं. नव्या रेल्वे मंत्र्यांनी भाडेवाढीचे संकेत दिलेत. पवनकुमार बन्सल यांनी आज मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी भाडेवाढ करण्याचे संकेत दिले.
लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना कोणतीही भाडेवाढ झाली नव्हती. मात्र आता खातं काँग्रेसकडं आल्यानंतर त्यांनी भाडेवाढीचे संकेत दिलेत.