रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?

नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.

PTI | Updated: Jun 23, 2016, 08:10 AM IST
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष? title=

नवी दिल्ली : नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.

राजन यांनी सध्याची तीन वर्षांची कारकिर्द सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर त्यांचे उत्तराधकारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या गव्हर्नरपदासाठी डझनभर नावे चर्चेत आली. त्यात डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर आहेत. यात एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते.  
 
दरम्यान, सध्या या पदासाठी माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबर रोजी संपत आहे. नव्या गव्हर्नाराची निवड जुलैच्या मध्यापर्यंत केली जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

राकेश मोहन सध्या वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. मोहन यांच्याखेरीज स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण व आर्थिक सेवा सचिव शक्तिकांत दास यांचीही नावे चर्चेत आहेत. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकर म्हणून भट्टाचार्य प्रख्यात असून २०१५ आणि २०१६ अशा सलग दोन्ही वर्षी फोब्रर्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. 

राजन यांनी २०१३ मध्ये २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. राजन नंतर भारताच्या २४ व्या गव्हर्नर म्हणून अरुंधती भट्टाचार्य यांची निवड निश्चित मानली जात आहे.