नवीन वर्षाची सुरुवात... चलो गोवा!

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात पर्यटनाचा मोसम सुरु झालाय. बहुतांशी किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. पर्यटन खात्यानेही विशेष तयारी चालवलीय. पर्यटकांना सवलती देण्यासाठी गोवा क्लब कार्ड तयार करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2012, 08:37 PM IST

www.24taas.com, गोवा
आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात पर्यटनाचा मोसम सुरु झालाय. बहुतांशी किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. पर्यटन खात्यानेही विशेष तयारी चालवलीय. पर्यटकांना सवलती देण्यासाठी गोवा क्लब कार्ड तयार करण्यात आलंय.
फेसाळणारा समुद्र, हिरवीकंच वनराई आणि काहीसं पाश्चिमात्य जीवनशैलीचं वातावरण यामुळं गोव्याला बहुतांशी पर्यटकांची पहिली पसंती असते. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर म्हणजेच इअर एन्डीगला तर पर्यटनाचा बहर येतो. सरकारनेही यंदा विशेष तयारी केलीय. पर्यटकांना अनेक ठिकाणांचा लाभ घेता यावा यासाठी गोवा क्लब कार्ड तयार करण्यात आलंय. पर्यटकांनी हे कार्ड घेतल्यास ५ ते २५ टक्के सूट मिळणार आहे. यात वॉटर स्पोर्ट, बोट क्रूझ, डान्स क्लब यांचा समावेश आहे.

गोव्यात अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी सशस्त्र राखीव दलाच्या तुकड्या तैनात आहेत. पर्यटन खात्यानं गोवा पोलिसांच्या मदतीनं विशेष योजना आखलीय, अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी दिलीय. यंदाची गोव्याची ट्रीप पर्यटकांसाठी खास असणार आहे. एव्हढं मात्र नक्की.