‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’

टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.

Updated: Jul 5, 2014, 07:05 PM IST
‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’ title=

नवी दिल्ली : टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपलं मंत्रालय नव्या टोल नीतीवर विचार करत असल्याचं म्हटलंय.

नव्या नीतीनुसार, वाहन चालकाला रस्त्यावर जिथवर जायचं असेल तितपर्यंतच टोल द्यावा लागू शकेल.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातही टोलचा मुद्दा ऐरणीवर आलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 44 टोलनाके बंद  केलेत. तसंच एसटीला लागणारा टोलही बंद करण्यात आलाय. महाराष्ट्रात एकूण 166 टोलनाके होते. त्यातील 73 टोलनाके सार्वजनिक बांधकाम खात्याचे, 53 एमएसआरडीसीचे, 44 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे  आहेत. यापैंकीच सार्वजनिक बांधकाम खात्याचे 34 आणि एमएसआरडीसीचे 10 टोलनाके बंद केले गेलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.