नितीशकुमार यांना न्यायालयाचा झटका, निवड अवैध

बिहारमध्ये राजकीय भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आली. मात्र, या ही निवड अवैध असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेय. त्यामुळे नितीशकुमार यांना हा मोठा झटका आहे.

Updated: Feb 11, 2015, 06:40 PM IST
नितीशकुमार यांना न्यायालयाचा झटका, निवड अवैध title=

पाटणा : बिहारमध्ये राजकीय भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आली. मात्र, या ही निवड अवैध असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेय. त्यामुळे नितीशकुमार यांना हा मोठा झटका आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीशकुमार यांना धक्का बसला आहे. नितीशकुमार बुधवारीच त्यांना समर्थन देणाऱ्या १३० आमदारांना घेऊन नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तिथे ते या सर्व आमदारांसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार आहेत. 

दरम्यान, या प्रकरणी बिहारचे राज्यपाल जोपर्यंत आपला निर्णय देत नाहीत, तोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागू राहिल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेय.

बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या एका समर्थक आमदाराने थेट पाटणा उच्च न्यायालयात धाव घेऊन नितीशकुमार यांची निवड अवैध ठरविण्याची मागणी केली होती.

बिहारमधील जदयू पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी जीतन राम मांझी असून, केवळ त्यांनाच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद यावेळी न्यायालयात करण्यात आला. 

जदयूचे नेते शरद यादव यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून त्यामध्ये नितीशकुमार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.