दक्षिण काश्‍मीरमध्ये पुन्हा संचारबंदी

 काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनांच्या मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर ही संचारबंदी आहे. दरम्यान श्रीनगरमधील कर्फ्यू काढण्यात आली आहेत. तसेच कर्फ्यूत संध्याकाळपर्यंत शिथिलता आणली जाणार आहे.

Updated: Jul 29, 2016, 06:56 PM IST
 दक्षिण काश्‍मीरमध्ये पुन्हा संचारबंदी title=

श्रीनगर :  काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनांच्या मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर ही संचारबंदी आहे. दरम्यान श्रीनगरमधील कर्फ्यू काढण्यात आली आहेत. तसेच कर्फ्यूत संध्याकाळपर्यंत शिथिलता आणली जाणार आहे.

 अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि सोपियॉं या जिल्ह्यांत पुन्हा संचारबंदी लावण्यात आली. तर उत्तर आणि मध्य काश्‍मीरमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत.

हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमिया मशिदीपर्यंत मोर्चा काढण्याचे फुटीरतावादी संघटनेने जाहीर केल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण काश्‍मीरमध्ये आज पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काश्‍मीर खोऱ्यात २० दिवसांपासून अनेक भागात लागू केलेली संचारबंदी गुरुवारी उठविली होती. हुर्रियत कॉन्फरन्सचा येथील म्होरक्‍या बुऱ्हाण वणी हा काही दिवसांपूर्वी चकमकीत ठार झाल्यानंतर राज्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे.