तामिळनाडूत द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलन, चोख पोलीस बंदोबस्त

तामिळनाडूमध्ये द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पोलिसांनी बैलांनाही ताब्यात घेतले आहे.

Updated: Jan 14, 2017, 01:48 PM IST
तामिळनाडूत द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलन, चोख पोलीस बंदोबस्त title=

चेन्नई : तामिळनाडूमध्ये द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पोलिसांनी बैलांनाही ताब्यात घेतले आहे.

तमिळनाडूत साज-या होणा-या पोंगल या सणाआधी, जलाईकट्टू नावाचा बैलांचा खेळ खेळला जातो. या खेळावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी उठवावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. 

या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयानं शुक्रवारी ही बंदी उठवण्याबाबत लगेच निर्णय द्यायला नकार दिला. तामिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या ए आय ए डी एम के तसंच केंद्र सरकार यांच्यावर याकरता द्रमुकनं दोषारोप केलाय.