गुड न्यूज.. रेल्वेचे तत्काळ तिकीट कन्फर्मच!

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज. आता तत्काळ तिकीट काढले तरी वेटींग असणार नाही. तुम्हाला लगेच आरक्षण मिळणार आहे. रेल्वेने प्रवाशांना नो वेटींगसाठी हे पाऊल उचलले आहे.

Updated: Jun 13, 2014, 04:21 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, रायपूर
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज. आता तत्काळ तिकीट काढले तरी वेटींग असणार नाही. तुम्हाला लगेच आरक्षण मिळणार आहे. रेल्वेने प्रवाशांना नो वेटींगसाठी हे पाऊल उचलले आहे.
1 ऑगस्टपासून तत्काळसाठी नो वेटींग ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही सेवा अधिक चांगली मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालय कामाला लागले आहे.
तत्काळ कोठ्यातून मिळणारे तिकीट हे लगेच आरक्षित होणार आहे. तत्काळ कोठा संपल्यानंतर सर्व बुकींग बंद करण्यात येईल, प्रवाशांना तत्काळ वेटींग तिकीट देण्यात येणार नाही.

जुलैमध्ये जाहीर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जुने नियम बदलण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी 150 रुपये देऊन बर्थ बुक करावी लागत असे, तसेचएसी आरक्षणासाठी 300 रुपये जास्त रक्कम ही भरावी लागते. तसेच प्रवाशांनी प्रवास केला नाही तरी पैसे कट होत असत. मात्र, या नियमात बदल होण्याची शक्यता असून आरक्षणासाठी मोजण्य़ात येणाऱ्या शुल्कात कपात होण्याची शक्यता आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या अधिक माहितीसाठी आणि रेल्वेची अचूक माहिती मिळण्यासाठी 1322 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.