पाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका

पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. 

Updated: Sep 29, 2016, 05:09 PM IST
पाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका title=

नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. 

मध्यप्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्ह्यातील टोमॅटो पाकिस्तानात प्रसिद्ध आहेत. प्रत्येक दिवशी पाकिस्तानमध्ये वाघाबॉर्डर मार्गाने, पाकिस्तानात टोमॅटोचे १२ ते १५ ट्रक जात होते.

पण उरी सेक्टरमधील भारतील कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी नुकसान झालं तरी चालेलं पण पाकिस्तानला टोमॅटो पाठवण्यावर विरोध केला, याविषयी त्यांनी मोदी आणि सुषमा स्वराज यांनाही टवीट केलं.

आखाती देशात दुसरी बाजारपेठ शोधण्याची विनंतीही या शेतकऱ्यांनी सरकारला केली आहे, पण पाकिस्तानला टोमॅटो पाठवणार नसल्याचं म्हटलंय.