आता, बाजारात 'मोदी' आंबेही!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या सगळीकडेच बोलबाला सुरू आहे. त्यात आणखी भर पडली आहे. आता चक्क नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आंब्याचा प्रकार तयार करण्यात आला आहे.

Updated: Mar 31, 2015, 03:56 PM IST
आता, बाजारात 'मोदी' आंबेही! title=

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या सगळीकडेच बोलबाला सुरू आहे. त्यात आणखी भर पडली आहे. आता चक्क नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आंब्याचा प्रकार तयार करण्यात आला आहे.

आंब्याच्या वेगवेगळ्या जाती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले हाजी कलिमुल्ला यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने एक आंब्याचा प्रकार तयार करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी तयार केलेल्या मोदी आंब्याची चव स्वत: मोदींनी चाखावी अशी कलिमुल्ला यांची इच्छा आहे. मात्र ते आंबे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची कोणतीही व्यवस्था त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते आंबे मोदींपर्यंत पोहचतील की नाही ही शंका कलिमुल्ला यांच्या मनात आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या नावाचे आंबे स्वत:च्या हाताने त्यांना देता यावे अशी इच्छा कलिमुल्ला यांना व्यक्त केली आहे. या आंब्याची चव मोदींना नक्की आवडेल असा विश्वसही त्यांनी व्यक्त केला आहे. 

हाजी कलिमुल्ला यांना आंब्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.