आता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क

सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2014, 09:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील एका खंडपीठानं हा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं, वर्ष २००६ मध्ये बनविल्या गेलेल्या किशोर अवस्थेतील मुलांसाठी बनविल्या गेलेल्या कायद्याचा आधार देत... आता, मुस्लिमांनाही हवं असल्यास मूल दत्तक घेऊ शकतात.
शबनम हाश्मी यांनी याबद्दल एक याचिका दाखल केली होती, त्यावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय. कोर्टानं सर्व धर्म आणि समुदायाच्या लोकांना मूल दत्तक घेण्यासंबंधी योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी शबनम यांनी केली होती.
यापूर्वी, देशात `ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा`च्या नियमांनुसार मुसलमानांना मूल दत्तक घेण्यास मनाई करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.