बराक ओबामा भारतात दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं राजधानी दिल्लीत आगमन झालं आहे. या वेळी सर्व प्रकारचे प्रोटोकॉल बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी दाखल झाले.

Updated: Jan 25, 2015, 11:17 AM IST
बराक ओबामा भारतात दाखल title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं राजधानी दिल्लीत आगमन झालं आहे. या वेळी सर्व प्रकारचे प्रोटोकॉल बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी दाखल झाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हस्तांदोलन तर केलंच पण गळाभेट देखिल घेतली. यानंतर बराक ओबामा हे आयटीसी मौर्या हॉटेलला रवाना झाले. 

ओबामा यांच्यासह यावेळी मिशेल ओबामा देखिल  दौऱ्यावर आहेत.बराक ओबामा यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.बराक ओबामा यांचा हा तीन दिवसीय भारतदौरा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.