'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्यास संघटनांचा विरोध

नवी दिल्ली : 'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्याला आता काही संघटनांनी आता विरोध केला आहे. 

Updated: Jan 23, 2016, 02:49 PM IST
'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्यास संघटनांचा विरोध title=

नवी दिल्ली : 'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्याला आता काही संघटनांनी आता विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या २७ डिसेंबरला केलेल्या 'मन की बात' मध्ये 'विकलांग' किंवा 'अपंग' या शब्दांऐवजी 'दिव्यांग' हा शब्द वापरला जावा असे सांगितले होते. तेव्हापासून अनेक सरकारी कामकाजात हा शब्द वापरण्यास सुरुवातही झाली होती.

पण शुक्रवारी पंतप्रधानांना लिहीलेल्या एका पत्रात काही संघटनांनी म्हटले आहे की फक्त शब्द बदलल्याने अपंगांसोबत होणाऱ्या वागणुकीत काही बदल होईल असे वाटत नाही. ज्यांच्यासोबत नेहमीच भेदभाव होत आला आहे त्यांच्या व्यंगाला दैवी उपमा दिल्याने त्यांना होणाऱ्या त्रासात काही फरक पडणार नाही.

अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रांत येण्यासाठी मदत केली पाहिजे अशी या संघटनांची मागणी आहे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत, असं या संघटनांचे म्हणणे आहे.