पीएफचा १६ ऑक्टोबरपासून युनिव्हर्सल अकाऊंट नंबर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’ (यूएएन) येत्या १६ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचार्‍यांना दिला जाणार आहे. 

Updated: Sep 22, 2014, 03:52 PM IST
पीएफचा  १६ ऑक्टोबरपासून युनिव्हर्सल अकाऊंट नंबर title=

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’ (यूएएन) येत्या १६ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचार्‍यांना दिला जाणार आहे. 

या योजनेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी कामगार मंत्रालय वेबच्या माध्यमातून कामगारांना लेबर आयडेंटीफिकेशन नंबरही (एलआयएन) देणार आहे. 

यूएएन मिळाल्यानंतर कोणताही कर्मचारी आपल्या प्रॉव्हिडंट फंडविषयी जाणून घेऊ शकेलच, पण त्याबरोबरच त्याची हार्ड कॉपी डाऊनलोडही करू शकेल. कर्मचार्‍याने नोकरी बदलली तरी त्याचा पीएफ ट्रान्सफर करण्याची यामुळे गरज भासणार नाही.

या दोन्ही योजनांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबरला करणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी कामगार सचिवांनी बैठक घेऊन आपल्या अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.