श्रीनगरमध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे

श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आलेत. शिवाय भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या. त्याचवेळी येथे दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ANI | Updated: Sep 25, 2015, 03:07 PM IST
श्रीनगरमध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे title=

जम्मू : श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आलेत. शिवाय भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या. त्याचवेळी येथे दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बकरी ईदच्या नमाजापूर्वी आज शुक्रवारी हा प्रकार घडला. इदगाह परिसरात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांवर जमावामध्ये दगडफेक केली. सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. 

ईदच्या पार्श्‍वभूमीवर अशा घटना घडण्याची शक्‍यता असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळेच काही फुटीरतावादी नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत काश्‍मीरच्या खोऱ्यात पाकिस्तानी झेंडे फडकाविण्यात आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.