शेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’!

सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. 

Updated: Aug 13, 2014, 11:36 AM IST
शेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’! title=

नवी दिल्ली : सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. 

तिरंगा फडकावत, ‘जन-गन-मन’ हे भारताचं राष्ट्रगीत गात हे पाकिस्तानी हिंदू नागरिक पहिल्यांदाच भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसंच हे नागरिक पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचं भाषण समोर ऐकू शकतील. याच निमित्तानं त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. सामूहिक भोजनसोबतच तिरंगाही इथं फडकावला जाणार आहे.

दीड वर्षांपूर्वी, सिंध प्रांतात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांवर धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक अत्याचार सुरु झाले. त्यामुळे, या हिंदू कुटुंबांनी पाकिस्तान सोडत शरणार्थी म्हणून भारताचा आसरा घेतला. आपली घरं, जमीन, व्यापार सोडून त्यांना इथं दाखल यावं लागलं.    

सध्या, ही कुटुंब दिल्ली-एनसीआरमध्ये वसलेत. दिल्लीतील बिजवासन, आदर्श नगर, कंझावला, मजनू का टीला, रोहिणी सेक्टर-11 तसंच फरीदाबाद आणि गुडगावमध्येही स्थलांतरितांचे कॅम्प आहेत. 

याच कॅम्पमध्ये शरण घेतलेले नेहरु प्रसाद म्हणतात, तिथलं आपलं स्वत:च घरं सोडून इथं खुल्या आकाशात मच्छरांसोबत आम्हाला जीवन जगावं लागतंय. पण, आपली जमीन ती आपलीच असते. खुल्या हवेत श्वास घेण्यातही एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे, आम्ही 14 ऑगस्टला (पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन) स्वातंत्र्य दिन साजरा न करता 15 ऑगस्टलाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. ही इच्छा आमच्या अगोदरच्या कित्येक पिढींची होती... जी आत्ता पूर्ण होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.