काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 3, 2013, 02:16 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, श्रीनगर
काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.
विशेष म्हणजे कारगिलनंतर एवढ्या जास्त काळ चाललेला हा पहिला संघर्ष आहे. केरन सेक्टर हे एलओसीला लागून असलेला भाग आहे. केरन सेक्टरनजीक असलेल्या पाकिस्तानी पोस्ट वरून दहशतवाद्यांना दारूगोळा आणि शस्त्रांस्त्रांचा पुरवठा होतोय. त्या विभागातला भूप्रदेश समतल नाही. त्यामुळे अतिरेकी शिरजोर झालेत. ही काळजीची बाब आहे.
४० च्या संख्येत घुसलेले हे फक्त दहशतवादी नाहीत तर यांच्यात काही पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम या स्पेशल फोर्सचे सैनिकही आहेत असं लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी म्हटलंय. श्रीनगरमधल्या सौरा अहमदनगर विभागात एका घरात अतिरेकी लपून बसले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलं आणि अतिरेकी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू होती.
मात्र या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना अपयश आलंय. अंधाराचा फायदा घेत अतिरेकी निसटले आहेत. या कारवाईत ५ पोलीस जखमी झालेत. काल रात्रीपासून ही फायरींग सुरू होती. अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेने हँडग्रेनेड्सचाही मारा केला होता. पळून गेलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी जोरदार सर्च ऑपरेशन सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.