पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Last Updated: Tuesday, October 15, 2013 - 15:43

www.24taas.com , वृत्तसंस्था, जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भिंबर गाली सेक्टरमध्ये भारतीय चौकीवर पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात कोणताही भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही.
सांबा सेक्टरमधील भारतीय चौकीवर काल झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला होता. आज सकाळीच पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौकीच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. भारतीय जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले.
सोमवारी सांबा सेक्टरमधील कटाव येथील चौकीवर करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचे नाव एम. बासू आहे. पाकिस्तानकडून गेल्या आठ वर्षांत आतापर्यंत १३१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात चर्चा होऊनही पाककडून अजूनही शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार सुरूच आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013 - 15:43
comments powered by Disqus