पाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल

पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे.. 

Updated: Jun 28, 2015, 03:06 PM IST
पाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल title=

अहमदाबाद : पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे.. 

केला यांनी कराची विद्यापीठातून एमबीबीएसची डिग्री घेतली असून 2006 मध्ये सुरक्षेच्या कारणामुळे ते अहमदाबादमध्ये आले. भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करण्यासाठी मेडिकल कॉन्सील ऑफ इंडिया (एमसीआय) जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत कोणत्याही डॉक्टरला प्रॅक्टीस करता येत नाही. गुजरातमध्ये असे जवळपास 200 डॉक्टर आहेत जे पाकिस्तानमधून भारतात आलेत पण सर्टिफिकेटविना आपल्या वैद्यकीय कौशल्यांचा वापर करू शकत नाहीत. भारतातील नियमांनी त्यांचे हात बांधले आहेत.

पाकिस्तानमधून सुरक्षेच्या कारणामुळे बरेच लोक गुजरातमध्ये वास्तव्यास आहेत. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंदू परिवारांवरील अन्याय तसेच मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीला कंटाळलेल्या सिंध प्रांतातल्या अनेक लोकांनी गुजरातमध्ये राहण्याचा पर्याय निवडलाय. 

46 वर्षांच्या डॉ. लोहाना यांनी म्हटलंय की पाकिस्तानात आपल्याला लोक देवासमान मानतात तसेच तिथे उत्पन्नही चांगले मिळते. पण दहशतवाद्यांच्या भीतीने आपल्याला भारतात नोकरी आणि मुलभूत गरजांसाठी भीक मागावी लागतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.