जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, ५ जवान शहीद

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, August 6, 2013 - 11:18

www.24tass.com , झी मीडिया, श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या हद्दीत घुसून हा गोळीबार केलाय. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘ट्वीट’द्वारे हल्ल्याच्या बातमीची पुष्टी केलीय.
याआधीही पाकिस्तानी सैन्यानं युद्धविरामाचं उल्लंघन केलंय. मागील सहा महिन्यांत ३३ वेळा पाकिस्तानी सैन्यानं नियमांचं उल्लघंन केलंय. संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी हे या हल्ल्याबाबत आज संसदेत निवेदन सादर करणार आहेत. युद्धनियमांचं सर्वाधिक वेळा उल्लंघन जुलै महिन्यात झालं असल्याची माहिती कालच संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दिली होती. जुलैमध्ये तब्बल ११ वेळा पाकिस्ताननं युद्ध नियमांचं उल्लंघन केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013 - 11:18
comments powered by Disqus