दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य

देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.  

Updated: Dec 29, 2015, 05:27 PM IST
दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य title=

नवी दिल्ली : देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय. ही माहिती मंगळावीर संसदेत देण्यात आली. हा नियम १ जानेवारी २०१६पासून अमलात येणार आहे.

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत एका पूरक मागणीवर उत्तर देताना सांगितले की, काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड आवश्यक आहे. याबाबत अधिसूचना जाही करण्यात आलेय.

५० हजारांचे हॉटेल बिल पेड करताना पॅन जरुरी
नवीन वर्षात तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुमचे बिल ५०  हजार रुपयांपेक्षा जास्त झाले तर पॅन कार्ड बंधनकारक असणार आहे. तसेच विदेश यात्रा करणाऱ्यांसाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे. देशातील काळा पैशावर नजर ठेवण्यासाठी १ जानेवारी २०१६ पासून हा नियम लागू होणार आहे.

१० लाख संपत्ती खरेदी करताना पॅन कार्ड जरुरी
१० लाख रुपयांची संपत्ती खरेदी करताना पॅन कार्ड जरुरी करण्यात आले आहे. मात्र, स्वस्त घर घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बात असेल. कारण आधी ५ लाख रुपये खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याचा प्रस्ताव होता.

पोस्टात पैसा जमा करणाऱ्यांसाठी दिलासा
सरकारने छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा देताना पोस्टात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करणाऱ्यांसाठी पॅन कार्ड अनिवार्य असल्याचे रद्द केलेय. तर एकाचवेळी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दागिणे किंवा सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी पॅनचा उल्लेख जरुरी आहे. याआधी ५ लाखांपेक्षा जास्त खरेदीसाठी पॅन बंधनकारक होते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना पॅन कार्ड जरुरी
५० हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश कार्ड खरेदी करणाऱ्यांना तसेच प्री-पेड सुविधा असणारे कोणतेही साधन खरेदी  करताना पैसे देताना पॅन कार्ड जरुरी आहे. तसेच गैर-सूचीबद्ध कंपनींमध्ये शेअर खरेदी करताना १ लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करताना पॅन आवश्यक आहे.

बॅंक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड जरुरी
प्रधानमंत्री जनधन योजना बॅंक खाते खोलने किंवा अन्य बॅंक खाते खोलताना पॅन कार्ड अनिवार्य आहे. तसेच आता लॅंडलाईन फोन आणि सेलफोन कनेक्शन घेताना पॅनची जरुरी असणार नाही.