'पीडीपीच्या आमदारांना हवेत मृत अफजल गुरुचे अवशेष!

जम्मू - काश्नीरमध्ये पीडीपी-भाजपची युती सत्तेत येऊन एक दिवसही उलटला नाही आणि तोच नवा वाद निर्माण झालाय. 

Updated: Mar 3, 2015, 11:31 AM IST
'पीडीपीच्या आमदारांना हवेत मृत अफजल गुरुचे अवशेष! title=

जम्मू : जम्मू - काश्नीरमध्ये पीडीपी-भाजपची युती सत्तेत येऊन एक दिवसही उलटला नाही आणि तोच नवा वाद निर्माण झालाय. 

मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईन यांनी राज्यात शांतिपूर्ण निवडणुकांच्या आयोजनांचं श्रेय दहशतवादी आणि पाकिस्तानला दिल्यानंतर आता पक्षाच्या आमदारांनी संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याच्या अवशेषांची मागणी केलीय. त्यामुळे, अर्थातच 'भगवा पक्ष' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला पीडीपीनं डिवचलंय. 

राज्यातील शांतिपूर्ण निवडणुकांचं श्रेय पाकिस्तान, हुर्रियत आणि दहशतवाद्यांना देतानाच, आम्हाला भारताच्या संविधानानं मतदानपत्र प्रदान केलीय. राज्यातील जनतेचा या अधिकारावर जास्त विश्वास आहे, अशी जोडणीही त्यांनी सचिवालयाचं कामकाज हाती घेतल्यानंतर केलीय. 

याच दरम्यान, पीडीपीचे काही आमदारांचा समूह काही स्वाक्षऱ्यांसह एक मागणी घेऊन आला. यावर, केंद्रानं अफजल गुरुचे अवशेष आपल्या ताब्यात द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. 

संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी दिल्लीतील तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली होती तसंच त्याला तिथंच दफनही करण्यात आलं होतं.  
 
पीडीपी आणि भाजप दोन्ही पक्षांच्या विचारधारांमध्ये जमीन - आस्मानाचा फरक असल्यानं आपल्यामध्ये हे रस्सीखेच सुरूच राहील... एका रात्रीच सगळं काही बदलणार नाही, सईद यांनी मुलगी आणि पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी म्हटलंय. 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.