पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

Updated: Jan 15, 2017, 10:27 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ  title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

याआधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 जानेवारीला पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदलेला दरांचा आणि रुपया-डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर निश्चित केले जातात.