पेट्रोल-डिजेलच्या दरात कपात होण्याची शक्यता

तुम्ही गाडी वापरत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर १ एप्रिलपासून कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नाहीतर इंधनाचे दर कमी होण्याचे संकेत आहेत.

Updated: Mar 29, 2015, 03:07 PM IST
पेट्रोल-डिजेलच्या दरात कपात होण्याची शक्यता title=

मुंबई : तुम्ही गाडी वापरत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर १ एप्रिलपासून कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नाहीतर इंधनाचे दर कमी होण्याचे संकेत आहेत.
 
पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर १ रुपयांनी तर सीएनजी प्रतिकिलो दीड रुपये आणि पीएनजी प्रतिकिलो १ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे. 

त्यामुळे १ एप्रिल रोजी देशातल्या नागरिकांना गुड न्यूज मिळणार की एप्रिल फूल ठरणार हे १ एप्रिलनंतरच समजेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.