पेट्रोल झालं स्वस्त पण डिझेलच्या किंमती वाढल्या

तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 1.09 रुपये प्रती लीटर कमी केल्याचं जाहीर केलंय. परंतु, डिझेलच्या किंमतीत मात्र 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. 

Updated: Jul 31, 2014, 10:17 PM IST
पेट्रोल झालं स्वस्त पण डिझेलच्या किंमती वाढल्या title=

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 1.09 रुपये प्रती लीटर कमी केल्याचं जाहीर केलंय. परंतु, डिझेलच्या किंमतीत मात्र 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. 

पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आज (गुरुवारी) रात्रीपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीचा सध्याचा स्तर लक्षात घेता पेट्रोलच्या किंमती कमी करण्यात आल्यात. एप्रिलनंतर पेट्रोलच्या किंमत पहिल्यांदा कमी झालीय.  
गुरुवारी तेल कंपन्यांच्या समीक्षा बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पेट्रोलच्या किंमत घटवण्याचा आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

सध्या ऑईल मार्केटिंग कंपन्यांना डिझेलवर 2.49 रुपये प्रती लीटर तोटा होतोय. तसंच, सबसिडीमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर दररोज 261 करोड रुपयांचा बोझा पडतोय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.