पेट्रोल १ रुपयाने स्वस्त!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, April 16, 2013 - 07:49

www.24taas.com, नवी दिल्ली
सोन्यापाठोपाठ पेट्रोलनेही सर्वसामान्य माणसाला सुखद धक्का दिला आहे. पेट्रोल 1 रुपयानं स्वस्त झालंय. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. तेल कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पेट्रोलचे दर कमी झाले आहेत.
याशिवाय सोन्याच्या दरात घसरण होऊन सोनं सव्वीस हजारांवर आलंय. आणखी चांगली बातमी म्हणजे सोनं आणखी स्वस्त होणार आहे. तेव्हा ग्राहकांनो, खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झालीय.

त्यातच सोन्याबरोबर पेट्रोलही स्वस्त झाल्यानं हा `सुवर्णइंधन` योग म्हणावा लागेल. यंदाचा गुढीपाडवा खरंच स्वस्ताईचा जमाना घेऊन आलाय का? वर्षभर असाच स्वस्ताईचा जमाना राहो, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोलचा नवा दर
मुंबई - ६९.०८ रुपये
दिल्ली - ६६.०९ रुपये
चेन्नई - ६९.०८ रुपये
कोलकाता - ७३.४८ रुपये

First Published: Monday, April 15, 2013 - 19:47
comments powered by Disqus