पाकिस्तानने हल्ला करण्याचा बेत आखण्यापूर्वीच नष्ट करणार एस-400 हे भारतीय क्षेपणास्त्र

गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशियात महत्वाच्या 16 करारांवर सह्या झाल्यात. यामध्ये संरक्षणावर जास्त भर दिला गेलाय. त्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहे. त्यानुसार S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाकिस्तानातील लाहोरमधून हल्ल्याचा कट रचला तर तो तेथेच नष्ट करता येऊ शकेल.

PTI | Updated: Oct 15, 2016, 05:45 PM IST
पाकिस्तानने हल्ला करण्याचा बेत आखण्यापूर्वीच नष्ट करणार एस-400 हे भारतीय क्षेपणास्त्र title=

पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशियात महत्वाच्या 16 करारांवर सह्या झाल्यात. यामध्ये संरक्षणावर जास्त भर दिला गेलाय. त्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहे. त्यानुसार S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाकिस्तानातील लाहोरमधून हल्ल्याचा कट रचला तर तो तेथेच नष्ट करता येऊ शकेल.

ब्रिक्स परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये आज झालेल्या व्दिपक्षीय चर्चेमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित १६ महत्वपूर्ण करार झाले. या करारांमध्ये सर्वात महत्वाचा करार आहे तो म्हणजे S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. त्यानुसार रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताला मिळणार आहे. 
 
या करारामुळे भारताचे हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित होणार आहे. शत्रू देशांची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांना आपल्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट करण्याचे हे तंत्रज्ञान आहे. S-400 हे S-300 ची पुढची आवृत्ती आहे. रशियन लष्करामध्ये २००७ पासून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टमचा वापर सुरु आहे. 
 
रशियाकडे एस-५०० असल्यामुळे ते एस-४०० तंत्रज्ञान विकत आहेत. एस-४०० मध्ये तीन वेगवेगळया पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून, या तंत्रज्ञानामुळे ४०० किलोमीटर क्षेत्रातील शत्रूचा हवाई हल्ला परतवून लावता येऊ शकतो. पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी असताना भारताला हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान कमालीचे उपयोगी पडणार आहे.  
 
दरम्यान, भारताचा पश्चिमेला पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळ तीन एस-४०० सिस्टम आणि पूर्वेला चीनजवळ दोन सिस्टम तैनात करण्याचा विचार आहे. एफ-३५, एफ-२२ रडारला सापडत नाहीत. शक्तीशाली रडार हे एस-४०० सिस्टमचे वैशिष्टय आहे. अमेरिकेची सर्वात अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाची एफ-३५, एफ-२२ ही लढाऊ विमाने एस-४०० क्षेपणास्त्र पाडू शकते, असा रशियन तज्ज्ञांचा दावा आहे.