पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या शेजारी असणाऱ्या देशात हिंमत नाही की, समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन लढण्याची त्यांच्यात क्षमता नाही. त्यांनी ती घालविली आहे, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढवला.

Updated: Aug 12, 2014, 06:45 PM IST
पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल title=

लेह : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या शेजारी असणाऱ्या देशात हिंमत नाही की, समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन लढण्याची त्यांच्यात क्षमता नाही. त्यांनी ती घालविली आहे, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढवला.

आपल्या पहिल्या लेह आणि लडाकच्या दौऱ्याच्यावेळी मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. लष्कर आमि भारतीय वायु सेना जवान यांना मोदी यांनी संबोधित केले. आपल्या शेजारी देशाने दहशतवादाला खतपाणी घातले आहे. त्यांच्यामाध्यमातून घुसघोरी सुरु आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सामना केला पाहिजे, असे मोदी म्हणालेत.

दोन महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा मोदी यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी जवानांचे मनोबल उंचावले. तुमच्यासोबत संपू्र्ण देश आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. विकास आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा संदेश घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरचा दौरा केला. गेल्या महिन्याभरातला मोदींचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. सकाळी पंतप्रधान लेहमध्ये दाखल झाले. तिथे भाषणात मोदींनी प्रकाश, पर्यटन, पर्यावरण ही या त्रिसूत्रीवर भर देत काश्मीरला नवी ओळख देण्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला.

लेहमध्ये मोदींनी लेह- कारगिल- श्रीनगर हायड्रो प्रोजेक्ट लाईनचं उदघाटन केलं. त्यानंतर मोदींनी कारगिलला जाताना भारताच्या लष्करीतळालाही भेट दिली. आमनेसामने युद्ध करण्याची पाकिस्तानची हिंमत नाही म्हणूनच पाकिस्तान दहशदवादासारख्या छुप्या कारवाया करत असल्याची टीका त्यांनी सैनिकांशी संवाद साधताना केली. तर कारगिलच्या भाषणात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक होत मै ना खाऊंगा ना खाने दुंगा असा इशाराच दिला.  

मी भ्रष्ट्राचारामुळे हैराण आहे. लोकांनी हात टेकले आहेत. लोकांना मी भरोसा देत आहे. मी भ्रष्ट्राचारच्या विरोधात आहे. मी भ्रष्ट्राचार करणार नाही आणि कोणाला करु देणार नाही, असे मोदींना यावेळी स्पष्ट केले. मी भ्रष्ट्राचाराविरोधात लढा देणार आहे. केंद्र सरकार याविरोधात आहे. मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई जिंकलो तर गरिबीविरोधातही लढाई जिंकू, अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.