'मेक इन इंडिया' वीकचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया वीकला सुरुवात झाली आहे. 

Updated: Feb 13, 2016, 08:42 PM IST
'मेक इन इंडिया' वीकचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन title=

मुंबई: केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया वीकला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याचं मुंबईमध्ये उद्घाटन केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या गुंतवणूकदारांना भारतात येण्याचं आवाहन केलंय. देशानं यंदा औद्योगिक उत्पादन वाढीचा 12.6 टक्क्यांचा दर गाठल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं. 

या सोहळ्याला देशभरातले उद्योजक, काही देशांचे राष्ट्र प्रमुख तसंच सरकारी अधिकारी उपस्थित होते. केंद्रात आपलं सरकार आल्यानंतर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 48 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

भारतात डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डिमांड या थ्री-डीच्या रुपानं चांगली संधी आहे. त्याला डिरेग्युलेशनची जोड देण्याचं आश्वासन त्यांनी उद्योजकांना दिलंय.