पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात. 

Updated: Mar 12, 2016, 09:49 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात. 

लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्या शिस्तीचं आणखी एक दर्शन पाहायला मिळालं. संसदीय कार्यमंत्री व्यंकया नायडू हे संसदेत बोलत असतांना पंतप्रधान मोदी संसदेत आले पण नायडू बोलत असतांना त्यांना अडथळा येऊ नये म्हणून त्यांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत पंतप्रधान मोदी बाजुलाच उभे राहिले. त्यांचं बोलून झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जागी बसले.

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ