मोदींना सूचवा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी मुद्दे

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, या भाषणात कोण-कोणत्या विषयावर आधारीत मुद्दे असावेत, असे मुद्दे सूचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.

Updated: Jul 26, 2015, 08:12 PM IST
मोदींना सूचवा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी मुद्दे  title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, या भाषणात कोण-कोणत्या विषयावर आधारीत मुद्दे असावेत, असे मुद्दे सूचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी करणाऱ्या भाषणांत आपण सुचविलेल्या मुद्द्यांचा नक्की समावेश करण्यात येईल. तुम्ही सुचविलेले मुद्दे माझ्यासाठी फायदेशीर ठरतील, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे.

पंतप्रधानांनी रविवारी आपल्या महत्त्वाकांक्षी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. 

पंतप्रधानांनी रस्ता सुरक्षा योजनेबरोबरच सरकारी योजनांबाबत माहिती दिली. त्यांनी कारगिल विजय दिनानिमित्त जवानांना मानवंदना दिली. 

कारगिल युद्ध हे फक्त सीमेपुरतेच लढले गेले नाही. भारतातील प्रत्येक शहर, गावाचे यामध्ये योगदान होते. २६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

शेतकऱ्याचे ज्या प्रमाणे देशाशी नाते आहे. त्याचप्रमाणे जवानाचेही देशाचे नाते आहे. आज कारगिल विजय दिनानिमित्ताने माझे शहीद जवानांना शत शत प्रणाम.

पंतप्रधान म्हणाले, की रस्ता सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून वाहतूक आणि सुरक्षा विधेयक आणण्यात आले आहे. रस्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला. तर, तो पूर्ण कुटुंबावर घाला असतो. 

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांपैकी एक तृतीयांश हे 15 ते 25 वर्षांदरम्यानचे युवक आहेत. 
आपल्या देशात प्रत्येक मिनिटाला रस्ता अपघात होत आहेत. मला आतापर्यंत अनेक नागरिकांनी सांगितले आहे, की तुम्ही रस्ता सुरक्षेबाबत बोला. 

पंतप्रधानांनी 2014 मध्ये सुरू केलेल्या माय गव्हर्मेंट पोर्टलवर (my govt) बोलताना सांगितले, की या पोर्टलवर नागरिकांनी अनेक सकारात्मक विचार मांडले आहेत. 

शासकीय व्यवस्थेत एक चांगले वातावरण तयार होण्यासाठी हे चांगले आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटी नागरिकांनी माय गव्हर्मेंट पाहिले आहे. 

आम्ही दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना सुरू केली असून, नागरिकांना चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॅशलेस ट्रिटमेंट सुरू करण्यात येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.